spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

येसंबा येथे खर्रा उधारीवर न दिल्याने ग्राहकाने दुकानदारावर चाकूने हल्ला करून केले गंभीर जखमी 

किशोर साहू: मौदा, ता. १८ : मौदा तालुक्याच्या सीमेवर स्थित असलेल्या व मौदा तालुक्या अंतर्गत येणारया येसंबा येथे शनिवार (दि. 16 ऑगस्ट) सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान आरोपी आशिष सेवकराम राऊत (३०) याने उधारीवर खर्रा न दिल्याने खऱ्याचे दुकानदार ऋषी सुरेश डडूरे (28)याला चाकूने कमरेवर चार वार करून रक्तबंबाळ केले. मोठ्या भावाला वाचवण्यासाठी आलेल्या लहान भाऊ छगन(25) याला पण हातावर चाकूने दोन वार करण्यात आल्यामुळे तोही जखमी झालेला आहे.पोलीस पाटील नरेंद्र राऊत यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस सायंकाळी त्वरित स्थळावर येऊन आरोपीला अटक केली. जखमी ऋषीला नागपूर येथील रामदास पेठ मधील वरूनम हॉस्पिटल येथे  येथे ऍडमिट करून त्याच्यावर उपचार सुरू आहे. आरोपीवर जुनी कलम 307 व नवीन कलम 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस स्टेशन पोलीस कन्हान उपनिरीक्षक राठोड यांनी प्रत्यक्ष स्थळावर सांगितले व पुढील सखोल तपास करण्यासाठी कन्हान पोलिसांचा ताफा गावात रविवार दिनांक 17 ऑगस्टला दुपारी बारा वाजता दरम्यान दाखल झालेला होता.

Popular Articles