spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ॲड. दिनेश दमाहे यांची भाजपच्या नागपूर ग्रामीण (काटोल) जिल्हा प्रसिद्धी व मीडिया प्रमुखपदी नियुक्ती

– आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान; पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार.

नागपूर :- अखिल भारतीय लोधी महासभेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष ॲड. दिनेश खेमसिंग दमाहे यांची भारतीय जनता पार्टीच्या नागपूर ग्रामीण (काटोल) जिल्हा प्रसिद्धी व मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.

यावेळी भाजप नागपूर ग्रामीण (काटोल) जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, जिल्हा महामंत्री आदर्श पाटले, ॲड. संदीप नागपुरे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्तीनिमित्त उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ॲड. दिनेश दमाहे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ॲड. दिनेश दमाहे यांनी सांगितले की, आमदार डॉ. आशीष देशमुख व आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण पूर्ण निष्ठेने व समर्पित भावनेने कार्य करू. तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पक्षाच्या विविध उपक्रमांची, संघटनात्मक कार्याची आणि विचारधारेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू. संघटनेने सोपविलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Popular Articles