spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘मऱ्हाटी’  महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली, २० : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्ती विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  बाबा खडक सिंग मार्कस्थित   ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये  दिनांक 27 ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7  वाजेपर्यंत गणेश मूर्ती विक्री प्रदर्शन सुरू आहे.

या ठिकाणी  6 इंच ते 3 फूट उंचीच्या 1,000 पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. या मूर्तींची किंमत 600 ते 30,000 रुपये आहे. सजावटीसाठी लागणारे साहित्यही येथे उपलब्ध आहे. ठाण्याचे मूर्तिकार मंदार सुर्यकांत शिंदे यांच्या कलाकृतींसह अनेक नामवंत मूर्तिकारांच्या मूर्ती प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. मागील तीस वर्षापासून महाराष्ट्र एम्पोरियम मध्ये गणेश मूर्ती विक्री प्रदर्शन आयोजित केले जाते. अधिक माहितीसाठी 011-23363366 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Popular Articles