spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर विभागात सरासरी 789.5 मिमि पावसाची नोंद सरासरी 103.53 टक्के पाऊस

नागपूर, दि २०  : नागपूर विभागात आतापर्यंत सरासरी 789.5 मिमि पावसाची नोंद झाली असून प्रत्यक्ष 103.53 टक्के पाऊस पडला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा वगळता विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

 विभागात 762.6 मिमि सरासरी पावसाची नोंद होते. जून ते आतापर्यंत प्रत्यक्ष 789.5 मिमि पाऊस पडला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यात 625.9 मिमि (101.9 टक्के), नागपूर 699.1 मिमि (108.71 टक्के), चंद्रपूर 787.7 मिमि (103.22 टक्के), गडचिरोली 1095.9 मिमि (121.75 टक्के) सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. भंडारा जिल्ह्यात 791.1 मिमि (97.73 टक्के) तसेच गोंदिया जिल्ह्यात 825.8 मिमि (95.87 टक्के) सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मागिल वर्षी विभागात 931.1 मिमि म्हणजेच सरासरी 122.1 टक्के पावसाची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात 246.4 मिमि, वर्धा जिल्ह्यात 160.6 मिमि, नागपूर 154 मिमि, भंडारा 148 मिमि, गोंदिया 114.7 मिमि तर चंद्रपूर जिल्ह्यात 185.5 मिमि पावसाची नोंद झाली आहे.

@filephoto

Popular Articles