कामठी २० : कर्मवीर दादासाहेब कुंभारे बिडी कामगार वसाहत, कामठी येथील बिडी कामगारांना त्यांच्या गाळ्यांचे व्याजमाफी प्रमाणपत्रे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
या उपक्रमाअंतर्गत एकूण ५६३ गाळेधारकांचे थकित व्याज आणि त्यावर आकारण्यात आलेले विलंब शुल्क एकूण ६ कोटी ७१ लक्ष ६२ हजार ५८० रुपये माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे बिडी कामगारांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभली. माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखाताई कुंभारे, म्हाडाचे मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले, भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान, कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, शहराध्यक्ष मंगेश यादव, कामठी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अजय कदम, माजी नगरसेवक प्रतिक पडोळे, राज हाडोती, विवेक मंगतानी, चंद्रशेखर तुप्पट, कपिल गायधने, दिनेश बिल्लारवान, आशु अवस्थी, राजेश देशमुख, राजेश खंडेलवाल, विनोद वाधवानी, अभिलाष यादव, कमल यादव, रजत यादव, कुणाल सोलंकी, राजेश शर्मा, अफजल अन्सारी, सावलाताई गजभिये, विलास बन्सोड यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निर्णयामुळे बिडी कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.








