नागपूर मनपा निवडणूक 2025 : उद्या जाहीर होणार नवीन प्रभागरचना; अनेक मोठे बदल अपेक्षित

0
37
nmc

 

नागपूर २२ : नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून राज्य निवडणूक आयोग आज नागपूर मनपाची नवीन प्रभागरचना जाहीर करणार आहे. आज (22 ऑगस्ट) प्राथमिक प्रारूप जाहीर होईल, तर 23 ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या घोषणेमुळे स्थानिक नेते, विद्यमान नगरसेवक आणि उमेदवारीची तयारी करणारे संभाव्य उमेदवार यांची धडधड वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या प्रभागरचनेमुळे अनेक विद्यमान प्रभागांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांचे राजकीय बालेकिल्ले प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलानंतर जुनी प्रभागरचना रद्द होणार असून, नवीन रचना नगरविकास योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या रणनीतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा, काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांनी अंतर्गत बैठका घेऊन आपली भूमिका ठरवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

नवीन प्रभागरचनेचे प्रारूप हायकोर्ट परिसरातील छोटे डाकघर येथे उपलब्ध असेल. नागरिकांना 28 ऑगस्टपर्यंत आपले हरकती आणि सूचना नोंदवण्याची संधी मिळणार आहे.