spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मित्राचा खून करणार्‍या आरोपीस जन्मठेप; पुसद जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल

पुसद २२ : ग्रामीण पो स्टे अंतर्गत जांब बाजार येथील आरोपी शेख अकबर शेख गयवु यास त्याचा मित्र सुरेश माधवराव शेलाटे याने दारू पीण्यास पैसे न दिल्याचे क्षुल्लक कारणावरून खून केल्याप्रकरणी गुन्हा सिध्द झाल्यामुळे भा.दं.वी. चे कलम ३०२ अनुसार जन्म ठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ६ महीन्याची कठोर कारावासाची शिक्षेचा महत्वपुर्ण निकाल येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश (Sessions Judge) क्र.१  एस.जे. रामगडीया मॅडम यांनी दिला.आरोपी व मृतक यास वाद करतांना साक्षिदार यांनी पाहीले
सदर प्रकरणामध्ये सरकारतर्फे सरकारी वकील  महेश कों. निर्मल यांनी काम पाहीले.

 १४/३/२०१८ रोजी आरोपी शेख अकबर शेख गयवु रा. जांब बाजार याने त्याचा मित्र मयत सुरेश माधवराव शेलाट यास जबरदस्तीने दारू पिण्यास पैसे मागत होता. आरोपी व मृतक यास वाद करतांना साक्षिदार यांनी पाहीले. वाद बाबत विचारले असता सुरेश ने वादाचे कारण सांगितले. दरम्यान दोघांना समजावून साक्षीदार निघून गेला. मात्र जाताना त्यांनी आरोपी जवळ बकरा कापण्याचा सुरा पाहिला होता. १५/०३/२०१८ रोजी सकाळी जमशेदपुर कडे जाणारे पुलाखाली सुरेश याचा मृतदेह (dead body) गळा कापलेल्या अवस्थेत मिळुन आला होता. घटनेच्या दिवशी मृतक सुरेश शेलाटे व आरोपी यास एकत्र घटनास्थळाकडे जातांना पाहील्याचे काही साक्षदारांनी सांगीतले. तसेच घटनेचे दिवशी पासुन आरोपी हा फरार असल्यामुळे पोलीसांनी चार दिवसा नंतर माहुर येथुन अकबर यास ताब्यात घेतले.

तपासाअंती आरोपी विरूध्द सबळ परीस्थीतीजन्य पुरावा मिळुन आल्याने दोषारोपत्र दाखल करण्यात आले.आरोपी विरुद्ध पुरावे व प्रभावी युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील महेश निर्मल यांचे तर्फे सादर करण्यात आला. पैरवी अधिकारी म्हणुन गजानन राठोड यांनी काम पाहीले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.