स्थानिक गुन्हे शाखेची 24 तासांत मोठी कामगिरी; चोरीचा गुन्हा उघड, आरोपी अटक, 1.82 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
61

 

गोंदिया २२ : गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केवळ 24 तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ₹1.82 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डबलिंग कॉलनी येथील रहिवासी सविता विष्णु पटेल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घराची सिमेंटची भिंत तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोने, चांदी आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची माहिती त्यांनी दिली होती. या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 683/2025 नोंद करण्यात आला. गुन्हा कलम 305 आणि 331(3) भारतीय दंड संहिता अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश राहुल नागदेवे (वय 22, रा. डबलिंग कॉलनी) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ₹1.82 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.