spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष किल्ल्याच्या देखाव्यात ‘ श्री ‘ ची होणार प्राणप्रतिष्ठा

स्वयंसहाय्यता गटांच्या हस्तकौशल्य दालनासह सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

नवी दिल्लीदि. २६ :  दिल्लीतील महाराष्ट्र सदनात बुधवार 27 ऑगस्ट  पासून गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. यंदा गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने उत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात सकाळी 11:30 वाजता गणपती बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा होईल. यावर्षी युनोस्को द्वारे राज्यातील किल्ल्यांना जागतिक वारसा मिळालेला आहे याच धरतीवर किल्ल्याचा देखावा उभारण्यात आला असून या ठिकाणी श्री ची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.

 निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वयंसहाय्यता गटांच्या हस्तकौशल्य दालनाची जोड या उत्सवाला मिळणार असूनमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ग्रामीण उद्योजकतेचा संगम अनुभवता येईल. आर विमला यांनी सर्व भक्तगणांना या उत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सव आणि हस्तकौशल्याचा मेळ

27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालणाऱ्या हस्तकौशल्य प्रदर्शनात नाशिकबीड आणि पालघर येथील स्वयंसहाय्यता गट खादीबटिकबांधनीवारली चित्रकलाचामड्याची उत्पादनेदागिने आणि पारंपरिक खाद्यपदार्थ सादर करतील. लाइव्ह किचनमध्ये सुजाता जाधव आणि धनश्री  यांचे कोकणी  उकडीचे मोदक आणि बटाटा वडे विशेष आकर्षण ठरेल. अमृतवाला महिला गटसावित्रीबाई फुले गटविराज खादी उपक्रमवारली आर्ट समूहरंजना जाधवयास्मीन शेख आणि जयप्रकाश सी. हनवंते यांचे खादी उत्पादने येथे लक्ष वेधतील.

आर विमला यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे दालन स्थानिक कलांना राष्ट्रीय व्यासपीठ देईल आणि ग्रामीण उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करेल. हा उपक्रम महाराष्ट्र सदनाला सांस्कृतिक केंद्र बनवेल आणि आर्थिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेलअसे आर विमला यांनी सांगितले.  सर्वांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता प्राणप्रतिष्ठापना आणि सायंकाळी 7 वाजता दिपाली काळे यांचा ‘कलारंग’ कार्यक्रम28 ऑगस्ट रोजी देबू मुखर्जी यांचा हिंदी गीतांचा नजराणा29 ऑगस्ट रोजी डॉ. पं. संजय गरुड यांचा ‘संतवाणी’30 ऑगस्ट रोजी सत्यनारायण महापूजामहाप्रसाद आणि स्थानिक कार्यक्रम31 ऑगस्ट रोजी मराठी-हिंदी नृत्याविष्कार1 सप्टेंबर रोजी जादूमिमिक्री आणि संगीत2 सप्टेंबर रोजी ‘विभावरी’ सिनेसंगीत3 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम4 सप्टेंबर रोजी भक्तीरंग5 सप्टेंबर रोजी सिद्धेश्वर झांज पथक आणि 6 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक होईल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.