संदीप कांबळे, कामठी २७ :- समाजात उपेक्षित जीवन जगणाऱ्या दिव्यांग,विधवा,परितक्त्या,अना थ,दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध अर्थसहाय्य योजना चालविल्या जातात ज्यामध्ये ही लाभार्थी निवड करतेवेळी लाभार्थी अर्जदाराच्या अर्जाला जोडलेली कागदपत्रांची योग्य ती शहनिशा करून लाभ मिळवून देणे तसेच कोणीही या लाभापासून वंचित राहू नये याची दक्षता घेणेहेतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समिती नेमण्यात आली असून या समितीची कामठी तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या कामठी तालुकाध्यक्षपदी भाजपचे पदाधिकारी व कढोली ग्रा प च्या माजी सरपंच प्रांजल वाघ यांची नियुक्ती करण्यात आली तर सदस्यपदी नरेश मोहबे,विनोद बावनकुळे, चंद्रशेखर तूप्पट, भगवान कोरडे,ऋषी भेंडे , सुभाष धोडसे, प्रीतम लोहासारवा तसेच खेमराज हटवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल आज कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश जगदाळे यांनी नवनियुक्त अध्यक्ष प्रांजल वाघ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नायब संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नायब तहसीलदार, प्रामुख्याने उपस्थित होते