किशोर साहू, मौदा, २३: मौदा तालुक्यातून एकमेव निवड झालेल्या ग्रामपंचायत इंदोरा येथे आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन नुकतेच (दि. 15 जुलै) ला उत्साहात पार पडले.
धरती आबा अभियान अंतर्गत जागृती मोहीम तसेच ‘धरती आबा कर्मयोगी’ या क्षमता विकास कार्यक्रम अंमलंबजावणी गाव पातळीवर केली जाते. यामुळे बहु-क्षेत्रीय सेवा थेट लाभार्थ्यांच्या दारात पोहोचवण्याच्या प्रयत्न आहे. या उपक्रमात वेगवेगळ्या विभाग मार्फत उत्पन्न दाखल सातबारा नकाशा वाटप करणे आधार कार्ड, राशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, जात प्रमाणपत्र,पी.एम. किसान अमृत आहार, पूरक पोषक आहार, संजय गांधी, श्रावण बाळ, योजना आधी वैयक्तिक लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले. आधार केंद्र कडून आधार अपडेट स्टेशन करण्यात आले. यावेळी एकूण जवळपास 100 लोकांनी या सर्व योजनांच्या लाभ घेतला. याप्रसंगी सरपंच नेकसिंग गहेरवार, उपसरपंच नकुल लोनिया समस्त ग्रामपंचायत सदस्यगण सह गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार शालिनी बारस्कर, पुरवठा अधिकारी गायधने , मंडळ अधिकारी, ग्राम अधिकारी, यांसह तहसील कार्यालयातील विविध विभागातील कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.




