सावनेर :- सावनेर पोलीस अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असता मानकर पेट्रोलपंप ते बोरगाव शिवार परिसरात आरोपी क्र. १) समिर रोशन टेंभुर्ने, रा. गांधी पुतळया जवळ, यशोधरा नगर नागपुर २) निलेश मुरलीधर बावने, वय २३ वर्ष, रा. वनदेवी नगर, यशोधरा नगर नागपुर 3) धनराज उर्फ दददु रामु टिकले, वय १९ वर्ष, रा. राजीव गांधीनगर, कळमना यशोधरा नगर, नागपुर हे सुर्यास्तानंतर आणि सुर्योदयाच्या पुर्वी रात्रीच्या वेळी स्वतःचे अस्तित्व लपवुन दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने वावरतांना मिळुन आल्याने नमुद आरोपीतांचे विरूध्द कलम १२२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.








