Saturday, March 28, 2026
spot_imgspot_img
spot_img

खेडी शेतात आग लागुन गावा लगत पोहचली

– गावक-यांच्या बचाव कार्यामुळे गाव आगीपासुन थोडक्या वाचले

कन्हान :- खेडी गावालगत कापणी झावेल्या गव्हाच्या शेतात अचानक आग लागुन जोरदार वा-यामुळे वाढुन जवळपास ५० एकरातील शेतातील गव्हु पिकाचा कचरा जळुन राख झाला. मोठया प्रमाणात गावकरी युवक व नागरिकांच्या बचाव कार्य तसेच कन्हान नगरपरिषदेच्या अग्निशमक दल व बंब वाहनामुळे आगीवर नियंत्रण मिळाल्याने थोडक्यात गाव वाचले.

शुक्रवार (दि.२७) मार्च ला दुपारी २.३० वाजता दरम्यान अचानक हवामान बदलुन जोरदार वारा वाहु लागला. तेव्हाच खेडी (खोपडी) गावालगत बहुतेक शेतातील गहु हॉरवेस्टर काढल्याने गव्हाचा कचरा शेतात पडुन होता. अश्या कुण्यातरी गहु कापणी झालेल्या शेतात आग लागुन जोरदार हवेमुळे एका शेतातुन दुस-या शेतात वाढत जाऊन गावाकडे येताना पाहुन गावक-यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा अतोनात पर्यंत केला. काही गावक-यांनी कन्हान नगरपरिषद आणि तहसिलदार पारशिवनी ला माहिती दिल्याने कन्हान नगरपरिषदेची अग्निशमक दल, बंब वाहन गाडी तातडीने पोहचुन आगीवर नियंत्रण मिळविल्याने खेडी गावातील घरे वाचल्याने थोडक्यात गाव आगी पासुन बचावले.

खेडी शिवारातील जवळपास ५० एकरात ही आग लागुन गव्हाच्या कच-याची राख झाली. काही शेतात गहु पीक कापणी करून गहु ठेव ला होता परंतु लोकांच्या मदतीने तो गहु तात्काळ उच लुन सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याने गहु पिकाचे नुकसान झाले नाही. ही आग विझविण्याकरिता गावातील तरूण मंडळी व नागरिकांनी मोठया प्रमाणात धावुन गेले. यात पटवारी, कोतवाल साहेब, विनोद इंगळे, मंगेश कडु, तुकेश घरजाळे, सुशिल ठाकरे, पोलीस पाटील, क्रिष्णा चौधरी, जितेंद्र वैद्य, देवराव इंगळे, दुर्गेश, भीमराव पांडे, रोशन, प्रशांत, प्रकाश, चंद्रशेखर, दिलीप, विनोद, प्रकाश, पांडुरंग, महेंद्र, अजय, प्रल्हाद मोहिते, महिला व पुरुषांनी आग आटोक्यात आण्याकरिता अतोनात पर्यंत केल्याने गाव थोडक्यात आगी पासुन वाचले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com