spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गट ग्रामपंचायत पावडदौना अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये भव्य तान्हा पोळा उत्साहात संपन्न

किशोर साहू, मौदा :- परंपरेचा उत्साह, संस्कृतीची जपणूक आणि गावकऱ्यांची एकजूट या सुंदर संगमात यंदाचे गट ग्रामपंचायत पावडदौना अंतर्गत येणाऱ्या पावडदौना, वांजरा, मोहखेडी ह्या तिन्ही गावात भव्य तान्हा पोळा उत्साहात संपन्न झाला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व गावकरी तसेच शिवसेना तालुकाप्रमुख नितेश वांगे आणि मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तान्हा पोळ्याला बालगोपालांसह गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सजवलेल्या नंदीबैलांसोबत चिमुकल्यांचा उत्साह आणि संपूर्ण गावातील आनंदी वातावरणाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नितेश वांगे यांच्या हस्ते नंदीबैलाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठ मान्यवर, पदाधिकारी, वडीलधारी मंडळी, महिला भगिनी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.