spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आरोही डिजीटल कॉन्व्हेन्टचे वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न

कामठी :- ग्राम विकास एज्युकेशन सोसायटी व्दारा संचालित आरोही डिजीटल कॉन्व्हेन्ट स्कूलचे वार्षिक स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन दिनांक 6 जानेवारी सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषद नागपूरचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सिताराम रडके तर स- उदघाटक अजय कदम माजी उपाध्यक्ष नगरपरिषद कामठी विशेष अतिथी भदन्त नागदिपंकर , सदस्य दिक्षाभूमी स्मारक समिती व प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक आकाश भोकरे तथा काशिनाथ प्रधान, डॉ महेश महाजन, तसेच पंकज रडके , संस्था सचिव, अपर्णा रडके, संचलिका आरोही कॉन्व्हेंट अनिता यादव, श्रद्धा राहुल यादव, विजय नंदनवार मुख्याध्यापक, श्रीकृष्णा खेडेकर, अरुणा रायबोले , शांता रडके, दिलीप मस्की, राजकुमार शेन्डे व प्राचार्या मयुरी यादव प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी पालक वर्ग व परिसरातील नागरिका बहुसंख्येने उपस्थित होते .आरोही डिजीटल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी अनेक मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी आरोही डिजीटल कॉन्व्हेंटच्या वतीने सर्व मान्यवर अतिथींचा शाळेला करित असलेल्या अनमोल सहकार्याबद्दल शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रिडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गौरव करण्यात आला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी शिंदे यांनी तर प्रास्ताविक अर्पणा रडके यांनी आभार प्रदर्शन कुंता शेन्डे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रियंका लांजेवार ,राखी बागडे , दिक्षा फुले यांनी परिश्रम घेतले .

Popular Articles