spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत भद्रावतीतील आरुष रवी गेडाम यांचे भव्य यश

नागपूर :- जैन कलार समाज भवन रेशीमबाग चौक, उमरेड रोड येथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. यास्पर्धेत भद्रावती (चंद्रपूर) येथील आरुष रवी गेडाम यांनी अवघ्या ६ मिनिटे ४१ सेकंदात १०० पैकी १०० प्रश्न अचूक सोडवत चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. छत्तीसगड, गोवा, पुणे, भंडारा, नागपूर, भुसावळ, यवतमाळ, एरंडोल, चंद्रपूर, भद्रावती, आग्रा, दिल्ली, जबलपूर, मुंबई, पालघर तसेच मध्य प्रदेश येथील विद्यार्थ्यांनी आपल्या गणनाशक्तीची कसोटी घेतली. स्पर्धेचे उद्घाटन विशाल कोहिटे, विवेक आगसे, सफिर अहमद आणि राजेश मसुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांची वेगवान गणनाशक्ती, अचूकता आणि एकाग्रता यांचे मूल्यमापन करण्यात आले. आरुष रवी गेडाम यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालक, शिक्षक आणि आयोजकांकडून त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या यशामुळे भद्रावती (चंद्रपूर) तसेच नागपूर शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले आहे. आयोजन अबॅकस अकादमी, नागपूर यांनी केले तर संचालन व आभार दीक्षा खानोरकर यांनी मानले.

Popular Articles