वेलतुर :- पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत फिर्यादी गोंविदा विठ्ठल बावणकर, ३१ वर्षे, रा. वार्ड क. ०२, वेलतुर, ता. कुही जिल्हा नागपुर, ह. मु. उदना जि. सुरत राज्य गुजरात यांनी पोलीस स्टेशन वेलतुर येथे तकार दिली की, दिनांक २३/०९/२०२५ ते दिनांक ०८/१०/२०२५ दरम्यान वेलतुर येथील फिर्यादीच्या घरी आलेल्या ईसम नामे संदीप वाघमारे व रविंद्र वाघमारे, रा. पालोरा, पारशिवनी, जि. नागपुर यांनी फिर्यादीला भुत बाधा असल्याची भिती दाखवुन भुत बाधा घालवण्याकरिता तांत्रिक पुजा करून फिर्यादीला जडीबुटी घेण्यास भाग पाडुन फिर्यादीची १,४५,५००/- रूपयाची आर्थिक फसवणुक केली आहे. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोलीस स्टेशन वेलतुर येथे कलम ३१८(४), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ३(२) महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा नोंद केला.
हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात वेलतुर पोलीसांनी गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच गुप्तबातमीदारांच्या माहीतीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या अधारे दिनांक ०६/०१/२०२६ रोजी तत्परतेने आरोपी नामे १) संदीप गोविंदा वाघमारे वय २७वर्षे, २) रविंद्र नंदु वाघमारे, वय २५ वर्षे, दोन्ही रा. पालोरा ता. पारशिवनी जिल्हा नागपुर यांना लाखणी, जि भंडारा येथुन ताब्यात घेतले. नमुद आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने अटक करण्यात आली.