मौदा :- पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत मौजा गुमशाळा शिवार हल्दीराम ते परसाळ जाणारा रोड येथे फिर्यादी जगदीश गुरूप्रसाद पंधराम, वय २६ वर्ष, रा. ग्रा. लेहगडवा ता. तामीया जि. छिंदवाडा, रा. मध्यप्रदेश ह.मु. पुनम हाउस, गुमथाळा, ता. कामठी हा आपली सेकंड शिफट करून पायदळ गुमधाळा जात असता रात्री अंदाजे १२.१५ वा दरम्यान तीन अज्ञात आरोपीतांनी काळया रंगाचे मोपेड गाडीवर ट्रिपलसीटने येवुन फिर्यादीचे खिश्यातुन जबरीने दोन हजार रूपये काढले तसेच मोबाईल सुध्दा मागत होते फिर्यादीने देण्यास नकार दिला असता गाडीवर मागे बसलेल्या इसमाने खिश्यातुन चाकु काढला व फिर्यादीला चाकु मारून जखमी केले व फिर्यादीचे मोबाईल व पैसे जबरीने हिसकावुन आपल्या मोपेड गाडीने पळुन गेले, अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोलीस स्टेशन मौदा कलम ३०९ (६), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद केला होता.
हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्हाचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी सुरू केला, नमुद पथकाने गुप्तबातमीदारांच्या माहीतीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या अधारे दिनांक ०५/०१/२०२६ रोजी आरोपी नामे आदिल उर्फ अहू इमरान खान, वय १९ वर्ष, रा. ताजबाग नागपूर यास मोठा ताजबाग, नागपूर येथुन ताब्यात घेवुन नमुद आरोपीकडे सखोल आणि कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याबाबत कबुली दिली. पोलीसांनी नमुद आरोपीकडुन एक कीपॅड मोबाईल जप्त केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.