देवलापार :- पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत आरोपी नामे कपुरचंद अमरलाल वरखडे, वय ४० वर्ष, रा. नवेगाव चिचदा, ता. रामटेक, जि. नागपूर याचेवर अवैध दारू बाबत अनेक गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपी असे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. नमुद आरोपी हा हातभट्टी मोहाफुल गावठी दारू तयार करून विकी करतो. त्याचे गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी कारवाई करून त्याचेवर गुन्हे नोंद केले, तसेच पोलीसांनी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. तरीसुध्दा कपुरचंद अमरलाल वरखडे याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली. त्याच्या गुन्हेगारी क्त्यामुळे अनेकांना दारूचे व्यसन जडले आहे. नमुद आरोपीचे कृत्य समाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर
पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात देवलापार पोलीसांकडुन एम.पी.डी.ए कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. मा. जिल्हाधिकारी, नागपुर यांनी नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याचा आदेश पारीत केले आहे.