कळमेश्वर :- हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांचे मार्गदर्शनात कळमेश्वर पोलीसांनी वर्चस्व निर्माण करून दहशत पसरविणाऱ्या आरोपीतांचा टोळी प्रमुख तसेच सदस्य अशा एकुण ६ आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये कारवाई केली आहे. सदर टोळीचा प्रमुख आरोपी नामे १) हरीश मोहन ग्वालवंशी, वय ५० वर्षे, रा. मकरधोकळा ता.जि. नागपुर हा असुन टोळी सदस्य आरोपी २) रोशन बबन यादव, वय ३२ वर्षे, रा. मकरधोकळा ता. जि. नागपुर ३) आशुतोष शैलेश ग्वालवंशी, वय २६ वर्षे, रा. मकरधोकळा ता.जि. नागपुर ४) अनिकेत अनिल उईके, वय २८ वर्षे, रा. मकरधोकळा ता.जि. नागपुर ५) आशिष विष्णु गिरी, वय ३४ वर्षे, रा.गंगा नगर, काटोल रोड, नागपुर ६) राजेश्वर उर्फ काल्या किसनजी सोनारे, वय ४५ वर्षे रा. मकरधोकडा ता. जि. नागपुर हे आहेत.
दिनांक २३/११/२०२५ रोजी रात्री ११.०० वा सुमारास विसावा बार ॲड रेस्टॉरन्ट समोरील रोडवर फिर्यादी जखमी नामे आरिफ लतीफ शेख रा. मातापुरा कळमेश्वर याला आरोपी १) हरिष ग्वालबंसी २) राजू सोनारे ३) आशिष गिरी (४) रोशन बबन यादव ५) आशुतोष शैलेश ग्वालबंसी ६) अनिकेत अनिल उईके सर्व रा. नागपूर यांनी जुन्या वादाचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून जखमी आरिफला जिवे मारण्याचे उददेशाने लाठी. दगड व हातबुककीने गारहाण करून जखमी केले व कारमध्ये अपहरण करून मारहाण करत फ्रेन्डस् कॉलनी येथे घेवून गेले. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम १०९, १४०(१), १८९(२), १९०,१९१ (३) भान्यासं प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व आरोपीतांना अटक करण्यात आली.
पोलीसांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास केला असता असे निदर्शनास आले की, सदर गुन्हा हा संघटीतरित्या केलेला असुन नमुद संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख हरीश मोहन ग्वालवंशी हा नेहमी एकट्याने किंवा साथीदारांसह गुन्हे करीत आलेला आहे. नमुद टोळी प्रमुख व टोळीतील सदस्य हे आर्थिक फायदयासाठी तसेच परिसरात त्यांचे टोळीची दहशत व वर्चस्व पसरविण्यासाठी खुन, खुनाचा प्रयत्न करने, खंडणी, अपहरण, प्राणघातक शस्त्र बाळगणे, गैरकायदयाची मंडळी जमविणे तसेच गंभीर दुखापत पोहचवून शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असतात. सदर टोळी प्रमुख आणि सदस्यांवर नागपूर ग्रामीण, नागपूर शहर या जिल्हयामध्ये सन २०१७ चे पुर्वी पासुन अनेक गुन्हे नोंद आहेत. आरोपीतांचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता पोलीसांनी वेळोवेळी त्यांचेवर गुन्हे नोंद करून प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपीतांनी त्यांची गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली, टोळी प्रमुख आरोपी याचेवर पोलीस स्टेशन गिट्टीखदान, पोलीस स्टेशन सदर, पोलीस स्टेशन सिताबर्डी, नागपुर शहर येथे आणि पोलीस स्टेशन कळमेश्वर नागपुर ग्रामीण येथे ११ गुन्हयांची नोंद आहे. तसेच टोळीचे इतर सदस्यांवर सुध्दा नागपुर शहर आणि ग्रामीण येथे अनेक गुन्हे नोंद आहे.
कळमेश्वर पोलीसांनी नमुद ६ आरोपीतांच्या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अन्वये प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांचे कडे सादर केला असता मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांच्या कार्यालयाकडुन सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९ अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे.