पुरोगामी विचारसरणीच्या चळवळीला कार्यकर्ते तेवत ठेवतात मग समाजाने मतदान करते वेळेस यांनी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे – बांगर

0
50

नागपूर :- इतिहास ग्वाही देत आजपर्यंत परिवर्तनाच्या चळवळी झाल्या त्या फक्त कार्यकर्त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर मोठ्या केल्या त्याच मुळे सामाजिक, राजकीय परिवर्तन वेळेनुसार बदलू शकल्या कारण त्यांना परिस्थितीचा जाण असते कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयावर समाजाने ठाम विश्वास ठेवून मतदान करावे असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे संस्थापक सदस्य शालिक बांगर यांनी केले ते आज आंरिमोच्या मुख्यालयात जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मतदान आणि त्यांचे विभाजन या विषयावर आयोजित खुल्या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी नेते राजू पांजरे हे होते. आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी जिजाऊ माँ साहेब यांच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केले तर सतिश शिवणकर यांनी दिपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. रमेश दुपारे यांनी केले. बांगर पुढे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत संविधानाच्या माध्यमातून मतदानाचे अधिकार बहाल केले जेणे करून प्रतिगामी शक्तीला मतदानामुळे पुरोगामी विचारसरणीची कास मजबूत होईल परंतु आजचे चित्र बघून मन खिन्न झाले आहे मतदानावर पुरोगामी विचारसरणीची पकड सैल झाली आहे आमच्या मतदारांवर कमान त्यांनी निर्माण करून तुकडे तुकडे केले आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे शब्द सांगताना बांगर भारावून गेले होते माझ्या शरिराचे तुकडे झाले तरी चालेल परंतु मतदानाचे तुकडे होऊ देऊ नका असंही भावनिक साद त्यांनी घातली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हंसराज उरकुडे यांनी केले चर्चासत्रात प्रफुल्ल इंगोले, प्रविण आवळे, लोखंडे, राहूल त्रिवेदी, राजु कांबळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.