spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहीद मिश्रा हायस्कूल तिरोडा येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन

तिरोडा :- नलिनी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था, चांदोरी बूज यांच्या वतीने व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचा प्रारंभ शहीद मिश्रा हायस्कूल तिरोडा येथे करण्यात आला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सशक्त आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन करण्यात आले. “विद्यार्थीदशेतच व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारली तरच उद्याचा समाज व्यसनमुक्त होईल,” असे प्रतिपादन संस्थेचे संचालक प्रवीण खेडीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहून कुटुंब व समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Popular Articles