– उमेश ढोणे यांनी -मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देऊनही अद्याप दखल नाहीं
– आ. रवी राणा अध्यक्ष विधानसभा आश्वासन समिती यांची पत्राद्वारे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीची केली मागणी
अमरावती/मुंबई :- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी, टोकरे कोळी व कोळी ढोर जमातींच्या प्रलंबित मागण्यांसाठी दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दत्ता भाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. मंत्रालय, मुंबई येथील मध्यवर्ती टपाल केंद्रात अनुक्रमांक ९८२०५७८, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ते प्राप्त झाले.
मुख्यमंत्री यांची उमेश ढोणे (महासचिव) यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीच्या बैठकीची मागणी केली असून महसूल मंत्र्यांनीही सकारात्मक निर्णयासाठी बैठक घेण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, दि. २३ फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे समाजबांधवांचे मोर्चा व उपोषण सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली असून आता शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.