किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही अडेगाव (पटाचा) येथे हनुमान देवस्थान पंचकमिटी व ग्रामवासी तर्फे वसंत पंचमी निमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. 23 जानेवारी)पासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात येत असून, दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे.![]()
शनिवार (दि 24 जानेवारी)ला गोंदिया जिल्ह्यातील चांदनी टोला येथील कीर्तनकार ह भ प विमल खोब्रागडे व सोबतीला ह भ प पांडुरंग शेंडे महाराज यांच्या हस्ते गोपालकाला व लगेच सामूहिक विवाह सोहळा व त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे या पवित्र ,भक्तिमय व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन हनुमान देवस्थान पंच कमिटी व समस्त ग्रामवासी यांनी केले आहे.