Friday, February 20, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अमर नगर जेष्ठ नागरिक मंडळातर्फे शिवजयंती साजरी

नागपूर :- अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ नागपूर यांचे वतीने गुरुवारी 19 फरवरी ला अमर नगर समाज भवन हनुमान मंदिर येथे मोठ्या आनंदाने शिवाजी जयंती ३९६ वी साजरी करण्यात आली. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर यांनी प्रास्ताविक भाषण दिले व त्यात त्यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव केला. गणपतराव निंबाळकर, डॉ.राजेश कुऱ्हाडे, विलास वाकडे, विजय पवार, वसंतराव इझनकर, यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश जिल्हारे, राजू फुलबांधे, शेषराव ठाकरे, प्रवीण धनझोडे, आशिष निंबाळकर, देवानंद दुधे, विलासराव वाकडे, गौतम वरघट, प्रकाश गोजे, धनराज भोयर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com