spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निमखेडा येथील विश्रांती कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा 

किशोर साहू, मौदा :- निमखेड़ा येथील विश्रांति कॉन्वेंट इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता पहली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच शाळा परिसरात आनंद मेळावा या कार्यक्रमानिमित्त खरी कमाई उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हजारो रुपयाची कमाई केली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन शांता खांडेकर , बिंदु तगिरिसा, अलका वासनिक, तेजस्विनी खांडेकर ,रक्षक खांडेकर व संजय शेलके यांचा हस्ते करण्यात आले. खरी कमाई उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. उल्लेखनीय म्हणजे विक्रीस ठेवलेले खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने बनविले होते.खरी कमाई या उपक्रमाच्या माध्यमातून आई वडिलांना पैसे कमविण्यासाठी किती श्रम घ्यावे लागतात हे त्यांना दिसून आले आहे.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक प्रियंका दोरखंडे, लतिका झाड़े,रीना दारोडे, शारदा किरपान,प्राची खरवाडे, शलिमराज विदुरी,सारिका चोखान्द्रे,वैभवि येलने, पल्लवी राउत, दिव्या अल्पाटि,उषा भीवगड़े सह समस्त शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.

Popular Articles