spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या मुलास जिवानिशी मारण्याचा प्रयत्न 

– आरोपीने मारल्याची तक्रार देण्यास दुचाकीने जाताना कारने धडक मारून केले गंभीर जख्मी. 

कन्हान :- कांद्री प्रभाग क्रं.१३ येथे घराच्या बांधकामावरून झालेल्या भांडणात सेवानिवृत्त शिक्षक रामु गि-हे व त्यांचा मुलगा मधस्थी करायला गेल्याने दोन्ही वडिल व मुलाला लोखंडी पाईपाने निलेश कुंभलकर याने मारहाण केल्याने रामुजी गि-हे व मुलगा ऋषीकेश दुचाकीने कन्हान पोस्टे ला तक्रार करण्यास जात असताना कारने नागपुर जबलपुर महामार्गावर नाका नं. ७ मरघडे दुकाना सामोर दुचाकीला उमेश कुंभलकर याने मागुन येऊन कारने जोरदार धडक मारल्याने वडील व मुलगा खाली पडुन दुचाकी आंबेडकर चौक पर्यंत घिसाटत नेली. या अपघातात जख्मी वडिल व मुलगा याचा नागपुर येथे उपचार सुरू असुन कन्हान पोलीसानी तीन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.

रामु महादेव गि-हे वय ६४ वर्ष रा. प्रभाग क्र. १३ कांद्री- कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपुर हे सेवा निवृत्त शिक्षक असुन त्यांचे घरा शेजारी निलेश केशव कुंभलकर वय अंदाजे ४५ वर्ष, उमेश केशव कुंभलकर वयु ४० वर्ष व त्यांचे जावई किशोर सदाशिव पोटभरे वय अंदाजे ५५ वर्ष हे राहत असुन मागिल दिड वर्षा पुर्वी रामुजी गि-हे घराचे बांधकाम करित असतांना किशोर पोटभरे यांच्या पत्नीने आमच्याकडे येवुन बांधकाम करायचे नाही असे म्हटले होते. सोमवार (दि.२५) मे २०२६ ला किशोर पेटभरे यांना त्यांचे घराचे बांधकाम करायचे असल्याने रामुजी गि-हे यांचे कडे सकाळी ९ वाजता आले आणि आम्ही तुमच्या घराकडे येवुन काम करू शकतो का ? त्यावर रामुजी गि-हे म्हणाले की, तुम्ही आम्हाला बांधकाम करू दिले नाही व त्रास दिला. आता आम्ही आमच्या घराकडे येवुन काम करू देणार नाही. तेव्हा किशोर पोटभरे यांची सासु बेबी कुंभलकर हिने शिवीगाळ करून भांडणाला सुरुवात केली. तेव्हा निलेश केशव कुंभलकर याने हातात लोखंडी पायपाचा तुकडा आणुन भांडण केले व रामुजी च्या उजच्या हाताच्या दंडावर मारले, त्यांचा मुलगा ऋषीकेश हा झगडा सोडवण्यास मध्यस्थी करिता आला असता मुलाच्या डाव्या हाताच्या बोटांवर मारले. त्यामुळे रामुजी मुलगा ऋषीकेस याचे सोबत हिरो पल्सर दुचा की क्र.एमएच ४० व्ही – ४०८८ ने पोलीस स्टेशन कन्हान येथे तक्रार देण्यास जात असता उमेश केशव कुंभलकर कार क्र.एमएच ४ बीजे ७३२२ ने हे सुध्दा पोलीस स्टेशन ला पाठीमागुन जात असतांना ९.३० वा.च्या दरम्यान उमेश ने हिरो पॅल्सर दुचाकी ला पाठी मागुन नाका नं. ७ मरघडे यांचे दुकाना समोर जबलपुर नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वर जोरदार धडक मारल्याने वडिल, मुलगा दोघेही खाली पडुन गंभीर जख्मी झाले. तर कारने दुचाकीला नाका नं. ७ ते आंबेडकर चौक कन्हान पर्यंत म्हणजे ५०० मीटर लांब घिसाटत नेली. यात रामुजीच्या डोक्याला, पाठीला, दोन्ही हाताला, पायाला मार लागला तसेच मुलगा ऋषीकेस याचे दोन्ही हाताला व पाठीला, डाव्या पायाला मार लागल्या ने वडिल व मुलाचा प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरने पुढील उपचारार्थ नागपुर ला पाठवुन तेथे दोन्ही जख्मीवर उपचार सुरू करण्यात आला आहे.

फिर्यादी सेवानिवृत्त शिक्षक रामुजी गि-हे यांच्या तोंडी बयाणावरून कन्हान पोलीसानी पोलीस निरिक्ष क वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात आरोपी १) बेबीबाई केशव कुंभलकर, २) निलेश केशव कुंभलकर वय ४५ वर्ष, ३) उमेश केशव कुंभलकर वय ४० वर्ष, तिघेही राह. प्रभाग क्र.१३ कांद्री- कन्हान यांचे विरूध्द कलम ११८(१), २८१, ३(५), ३५२ बी.एन.एस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

Popular Articles