सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिना निमित्त २ ते ७ जानेवारी कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या पोलीस रेजिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने रविवार (दि.०५) जानेवारी समर्थ विद्यालय, रामटेक येथील विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, कायदा व सुव्यवस्थेचे महत्व, वाहतूक नियमन, गुड-टच, बॅड-टच, स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन, सायबर फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच महिला सशक्तीकरण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये वापरली जाणारी विविध शस्त्रे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून त्यांची माहिती देण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जाणीव निर्माण करण्यासोबतच पोलिसांविषयी विश्वास व आदर निर्माण करण्याचा उद्देश साध्य करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम, पो.उप.नि. नरोटे,पो.ह. निलेश गावंडे, प्रफुल्ल रंधई, परमेश्वर वाघमारे, विद्या सेलोकर, पो.कॉ. ओमकार तिरपूडे हे उपस्थित होते. सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्नही सोडवले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला असून पालक व शिक्षक वर्गातूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.








