– दीक्षाभूमीवर भिमा कोरेगाव स्तंभाला दीडशे सेवानिवृत्त महार रेजिमेंट सैनिकांची मानवंदना
नागपूर :- परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर च्यावतीने भिमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन सोहळ्याचे आयोजन १ जानेवारी ला पवित्र दीक्षाभूमीच्या परिसरात गुरुवारी करण्यात आले असून पवित्र दीक्षाभूमीवर भीमा कोरेगाव स्तंभाला दीडशे सेवानिवृत्त महार रेजिमेंट सैनिक सायंकाळी ठिक ५ वाजता. मानवंदना प्रदान करतील. यादरम्यान समाज बांधवांनी पवित्र दीक्षाभूमीवर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून निळी टोपी घालून बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन विलास गजघाटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, माजी सैनिक संघटना, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि आंबेडकरी अनुयायी यांनी केलेले आहे.








