Monday, February 16, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाशिवरात्रीनिमित्त निसतखेडा येथे भोलेनाथ बाबा तांडव यात्रेचा गजर 

किशोर साहू, मौदा :- रविवार(ता.15 फेब्रुवारी)ला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महादेवघाट निसतखेडा येथे भोलेनाथ बाबा यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आले. या दरम्यान निसतखेडा गावात भोलेनाथ बाबा तांडव यात्रेच्या गजर चालत शेकडो भाविक भक्तांनी हजेरी लावली. गावातील प्रतिष्ठित नागरिक फागोजी दारोडे यांच्या हस्ते महाकालेश्वराच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आले .

गावकऱ्यांच्या शिव महोत्सव शिवरात्री दिनी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यात आला. भोले की बारात यात शंकरजींच्या वेशभूषेत आदित्य दारोडे व त्यांच्या सहकार्यात अघोरीचे वेशभूषा अनेक मुलांनी घेत यात्रेत सहभागी झाले. स्मशानभूमीचा इतका विकास करण्यात आला आहे की, लोक सकाळ-संध्याकाळ स्मशानभूमीत फिरायला जातात. यात प्रामुख्याने या स्मशान घाटाची एका वर्षात काया पलट करून स्मशान घाट सौंदर्यकरण करून कायापालट करणाऱ्या सरपंचाची गावातील लोक स्तुती करतात व ग्रा पं निसतखेडा सरपंचा प्रज्ञा राहूल बावने यांनी सांगितले की निसतखेडा गावातील सर्वाधिक लोकांच्या पाठबळ असून स्मशानघाट स्मशान घाटासारखे न राहता त्यात एक नवीन ऊर्जा तयार होऊन जणू गार्डण सारखं परिसर या निसतखेडा पावन भूमीमध्ये करण्यात आला.

याप्रसंगी पोलीस पाटील प्रकाश महादुले,उपसरपंच आशिष शिवचरण चव्हाण, प्रतिष्ठित नागरिक हरिश्चंद्र दारोडे , दिलीप चव्हान ,अंकीत महादुले, रंजीत घिवतोंडे, आशिष भिलकर, राधेश्याम डडूरे, रोशन डडूरे, विठ्ठल मसराम, रवींद्र चव्हाण, राजू सहारे, अजित लक्षणे, विशाल डडूरे, सुरज भिलकर, हेमराज डडूरे, मधुकर भिलकर, सोहन नारनवरे, ईश्वर महादुले, अशोक डडूरे, बंडू लोंढेकर, रामभाऊ भिलकर, अमोल डडूरे, मंगेश कोसरे, राहुल बावने, अशोक महादूले, धिरज डडूरे, रोहन डडूरे, देवेंद्र डडूरे, भोजराज बागडे, योगेश भिलकर, विक्रम डडूरे, नंदकिशोर डडूरे, आदित्य दारोडे, विलास महादुले, अनुकल डडूरे सह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com