किरात, किराड समाज स्नेह मिलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
कन्हान १२ : – किरात, किराड समाज व्दारे भुजलिया उत्सव कार्यक्रम तुकाराम मंदीर येथुन भुजलिया शोभा यात्रा काढुन जे एन रोड डोणेकर सभागृहात भुजलिया चे विसर्जन केल्यावर समाज बांधवांचा स्नेहमिलन कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून स्नेह भोजनाने कार्यक्रमाची थाटात सांगता करण्यात आली .
किरात, किराड समाज कन्हान व्दारे २०११ पासुन भुजलिया उत्सव व स्नेहमिलन कार्यक्रम उत्सा हाने साजरा करण्यात येतो. सामाजिक एकता आणि अखंडतेचे प्रतिक रक्षाबंधन (राखी) सणा निमित्य रवि वार (दि.१०) ऑगस्ट ला दुपारी ३ वाजता तुकाराम मंदीर, संत तुकाराम नगर कन्हान येथुन भुजलिया शोभायात्रा काढुन तारसा रोड ने महामार्गावरील डोणे कर सभागृह कन्हान येथे पोहचुन भुजलियांचे विसर्जन करून एकमेकाना भुजलिया देऊन मोठयांचे आशिर्वा द घेत प्रेम आणि एकतेचा संदेश दिला. सायंकाळी ८ वाजता किरात, किराड समाज स्नेहमिलन कार्यक्रम मा. नारद दारोडे यांचे अध्यक्षेत, प्रमुख अतिथी डॉ.. आशिष झरारीया, डॉ. दिव्या झरारीया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरू वात करून समाज कार्यकारणी व्दारे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरा च्या मार्गदर्शनांतर स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन ज्ञानेश्वर दारोडे हया या उत्सावाच्या माध्यमातुन कन्हान परिसरातील समाज बांधवांचे एकत्रीकरण करून सामाजिक एकोपा निर्माण केला जात असल्याचे संबोधित केले. सुत्रसंचालन नत्थुजी नन्होरे यानी तर आभार संजय मोहने यानी व्यकत केले. कार्यक्रमास बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नरेश जी गडे, रामराव लुहुरे, अशोक खंडाइत, राजेंद्र काठोके, नितेश लुहूरे, दुर्योधन मोहने, अंकुश बादुले, मोतीलाल हारोड़े, मनिष डडुरे, दीपक हारोडे, सुधिर गड़े, माधव काठोके, आकांशा दारोड़े, सीमा लुहुरे, स्वाति दारोड़े सह समाज बांधवानी सहकार्य केले.




