spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गडचिरोलीत वैधमापन शास्त्राचा मोठा पर्दाफाश

– पडताळणी–मुद्रांकनाच्या नावाने दुकानदाराची लूट

– ब्लॅक सनसुई वेट मशीनचा अभिषेक गुंफलवार आणि जनबंधू दोघे भाऊ पंचनाम्यात दोषी.

सतीश कडू,प्रतिनिधी नागपूर :- वैध मापन शास्त्र नागपूर विभाग नागपूर अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका, लखमापूर बोरी येथे वैधमापन शास्त्र कायद्याचे गंभीर उल्लंघन करत शासनाची व दुकानदाराची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील मे. लाड हार्डवेअर या दुकानास मेसर्स ब्लॅक सनसुई वेट मशीन यांनी वजनकाट्यांच्या पडताळणी व मुद्रांकनाच्या नावाखाली लुबाडून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात ब्लॅक सनसुई वेट मशीनचा प्रो.आरोपी अभिषेक गुंपलवार आणि दोन जनबंधू सख्खे भाऊ असे तिघेही दोषी आढळून आला असून, याबाबत अधिकृत पंचनामा करण्यात आला आहे. वैधमापन शास्त्र चंद्रपूर विभागाचे उपनियंत्रक जितेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील इतर चार अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत तपास केला. तपासादरम्यान मे. लाड हार्डवेअर येथे वापरण्यात येणारे वजनकाटे शासनाकडून अधिकृत पडताळणी व मुद्रांकन केलेले असून सुद्धा न झाल्याचे भासवून फसवणूक केलेले असल्याचे निष्पन्न झाले. पंचनाम्यात स्पष्टपणे नमूद आहे की, ब्लॅक सनसुई वेट मशीन यांनी लाड हार्डवेअर यांच्याकडून वजनकाट्यांच्या पडताळणी व मुद्रांकनासाठी रक्कम घेतली; मात्र सदर शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर लाटले. त्यामुळे एकीकडे शासनाची आर्थिक फसवणूक झाली, तर दुसरीकडे लाड हार्डवेअर यांची थेट फसवणूक व दिशाभूल करण्यात आली. या प्रकारामुळे लाड हार्डवेअर यांना वैधमापन शास्त्र कायद्यांतर्गत अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला असून, ही संपूर्ण जबाबदारी ब्लॅक सनसुई वेट मशीन व त्यांचे प्रो. अभिषेक गुंपलवार आणि दोन जनबंधू सख्खे भाऊ यांची असल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. तसेच यात विभागीय निरीक्षक यांचा पण कामात बेजबाबदार पणा दिसून येतो.अशा बेकायदेशीर कामात सदर विभागीय निरीक्षक सामील तर नाही ना?असा प्रश्न पडतो.याची पण चौकशी होणे गरजेचे आहे.

सदर कृत्य हे वैधमापन शास्त्र कायदा 2009 व नियम 2011 यांचे सरळ उल्लंघन करणारे असून, शासनाची फसवणूक, आर्थिक अपहार, तसेच दुकानदार व ग्राहकांची दिशाभूल या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत मोडते. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, दोषी आरोपीवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच अशा बेकायदेशीर वजनकाटे पुरवणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून परवाने निलंबित करून नियंत्रण ठेवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून तसेच व्यापारी वर्गातून होत आहे. यावर नागपूर विभागाचे सहनियंत्रक काय निर्णय घेतात यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Popular Articles