सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- परमात्मा एक आनंदाम रामटेक येथे येत्या २२ फेब्रुवारी ला भव्य अशा वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा मेळावा १९९२ पासून आजपर्यंत पर्यंत सुरू असुन या सोहळ्याच्या आयोजन बजरंग मेहर, राष्ट्रीय अध्यक्ष, आनंदधाम यांच्या वतीने दरवर्षी केला जातो. यामध्ये आतापर्यंत हजारो वर-वधुनी या परिचय मेळाव्याचा लाभ घेऊन आपला जोडीदार पाहून निवडण्याचे काम केलेले आहे. विशेष म्हणजे मेळाव्यात एकाच ठिकाणी विविध जातीचे वर-वधू पाहायला मिळतात त्यामुळे वेळ, पैसा वाया जात नाही आणि त्रासही सहन करावा लागत नाही. जोडीदार निवडल्यानंतर ज्यांची परिस्थिती गरीब असेल अशा जोडप्यांचे लग्न सुद्धा ३ एप्रिल, बाबा जुमदेवजी यांच्या जयंती पर्वावर लावुन दिले जाते. २०१० पासून हे कार्य अविरत सुरु असून आजपर्यंत सामूहिक विवाह सोहळ्यात अनेक विवाह लावून दिले गेले आहे. सतत गेल्या १६ वर्षापासून अशा विवाह सोहळ्याचे आयोजन आनंदधाम येथे केले जाते. तसेच रामाकोना, मध्यप्रदेश येथे गेल्या ६ वर्षापासून अशा विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निष्काम, निशुल्क आणि मोफत लग्न लावून देण्यात येत असल्यामुळे गोरगरीब याचा भरपूर लाभ घेत आहेत. या गुणवैशिष्ट्यांमुळे अशा सोहळ्याचे सर्वत्र गुणगौरव होत आहे. यावर्षी सुद्धा परमात्मा एक आनंदधाम, रामटेक येथे २२ फेब्रुवारी २०२६, रविवारला वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वर-वधू परिचय मेळाव्याचा लाभ घेऊन आपले जीवन समाधानी करण्याचे आवाहन बजरंग मेहर यांनी जनतेला केले आहे.
२२ फेब्रुवारीला वधू-वर परिचय मेळावा
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.