spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ विभागीय पात्रता फेरीसाठी नोंदणीकृत उमेदवारांचे आवाहन

यवतमाळ :-  जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी विभागीय पात्रता फेरीचे आयोजन दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, येथे करण्यात आले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टतेची स्पर्धा असून, २३ वर्षांखालील तरुणांना आपल्या कौशल्यांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. ही स्पर्धा कौशल्य क्षेत्रातील ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाते. यापूर्वी झालेल्या ४७ व्या जागतिक कौशल्य स्पर्धेत ६३ कौशल्य क्षेत्रांमधून ५० देशांतील १० हजारांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होते. ही स्पर्धा १५ देशांमध्ये १२ आठवड्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ ही शांघाई येथे आयोजित होणार असून, त्यासाठी विभागीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील निवड प्रक्रियेतून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांच्या वतीने यापूर्वी नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी यशस्वीरीत्या नोंदणी केली आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांनीच दिनांक २४ डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे आयोजित विभागीय पात्रता फेरीमध्ये अनिवार्यपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त सुशील उचले, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.