spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्रीमती हिराबाई वसतिगृहात मुलांसोबत कॅप्टन सतीश बेलसरे यांनी साजरा केला वाढदिवस

कन्हान :- समाजसेवा आणि संवेदनशीलतेचा एक अनोखा आदर्श निर्माण करत सामाजिक बांधिलकीने कॅप्टन सतीश बेलसरे यांनी आपला वाढदिवस श्रीमती हिराबाई वसतिगृहातील मुलांसोबत अत्यंत साधेपणाने आणि आपुलकीने साजरा केला. भव्य कार्यक्रम आणि वैयक्तिक सोहळ्यांपासुन दुर राहुन त्यांनी हा खास दिवस वसतिगृहातील गरजु आणि गुणवंत मुलांच्या आनंदासाठी समर्पित केला.

सोहळ्यात मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच या कार्यक्रमाची सर्वात मोठी यशोगाथा ठरली. कॅप्टन सतीश बेलसरे यांनी मुलांसोबत केक कापला तसेच त्यांना मिठाई आणि आवश्यक वस्तु भेट म्हणुन दिल्या. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला आणि जीवनात शिक्षणाचे महत्त्व पटवुन देत पुढील उन्नती करिता प्रेरित केले. वसतिगृहातील मुलां नीही कॅप्टन बेलसरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी अनेक मान्यवर नागरिक, समाजसेवक आणि मित्र परिवार उपस्थित होते. त्यांनी कॅप्टन सतीश बेलसरे यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासुन कौतुक केले. कार्यक्रमास प्रामुख्याने गणेश रामापुरे, सूर्यभान फरकाडे, शैलेश झेंडे, नितेश भरणे, सुवर्णा रामापुरे, अस्मिता बेलसरे, भूमिका भरणे, निलिमा फरकाडे, राधिका झेंडे, दिगांबर हारगुडे, आकाश भगत, पवन सरोदे, सागर हुमणे, चेतमणी मिश्रा, रोतेश पात्रे आणि अजय पात्रे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी या गोष्टीवर भर दिला की, वाढदिवसासारखे वैयक्तिक प्रसंग जर समाजातील अशा घटकांसोबत साजरे केले, तर समाजात एक सकारात्मक संदेश जातो. वसतिगृह प्रशासनाने कॅप्टन सतीश बेलसरे आणि त्यांच्या संपुर्ण टीमचे या संवेदनशील प्रयत्नाबद्दल आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.