मौदा :- मौदा पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा अंबाडी ते केसोरी रोडवर ग्रामपंचायतच्या पडीक जागेमध्ये काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे मौदा पोलीस घटनास्थळी पोहचले असता, नमुद घटनास्थळी काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी नामे १) पंकज लक्ष्मन कुथे, वय ३४ वर्ष, रा. परसाड २) अतुल सोपान बावने, वय ३३ वर्ष, रा. वडोदा ३) अंकुश पुडलिक मालोदे, वय ५० वर्ष ४) धर्मराज सुर्यभान वानखेडे, वय ३७ वर्ष, रा. गुमथळा ५) जुशी गोपाल डोंगरे, वय ३५ वर्ष, रा. सुदरगाव वडोदा ६) किसना अर्जुन महाळाकार, वय ५१ वर्ष, रा. केसोरी ७) विजय देवराव ढोबळे, वय ४२ वर्ष, रा. कांदी यांना जागीच पकडले. पोलीसांनी घटनास्थळावरून ५२ तास पत्ते आणि रोख रक्कम असा एकुण २८८०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद ०७ आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन मौदा येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.