पारशिवणी :- अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक पेट्रोलींग करीत मनसर ते पारशिवनी असे जात असतांना आरोपी शांताराम फुलसिंग कुंभरे वय. ६० वर्षे रा. डोला माईन्स पोस्ट मनसर ता. रामटेक, जि. नागपुर हा त्याचे रहाते घरासमोरील रोडवर त्याचे हातात कापडी पिशवी घेवुन उभा असतांना पोलीस वाहन पाहुन आडोशास लपुन गेल्याने त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची पंचासमक्ष झडती घेता त्याच्या हातातील पिशवीत ३२४ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला. नमुद आरोपीला ताब्यात घेवुन त्याची कसून चौकशी केली असता आरोपी के २ विशाल चिंचोलकर, रा. धरम नगर, कन्हान, ता. पारशिवनी याने सदर गांजा विक्री कामी दिला असल्याचे त्याने सांगितले. पोलीसांनी पंचासमक्ष अंमली पदार्थ गांजा वजन ३२४ ग्रॅम, ०२ चिलम असा एकुण कि. ६६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नमुद प्रकरणी दोन्ही आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन पारशिवणी येथे एन. डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी के १ याला अटक करण्यात आली आहे.