उमरेड :- उमरेड पोलीस पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी मोहपा फाटा, उमरेड येथे नाकाबंदी केली असता १० चक्का ट्रक क एम एच ४० वी एल ४७१८ मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असतात्यामध्ये रेती आढळुन आली. वाहन चालक आरिफ नफीस खान, वय ३१ वर्षे, रा. अजराळ, ता. खरखोदा, जि मेरठ, राज्य, उत्तर प्रदेश ह.मु. खरबी, ता.जि नागपुर हा मिळुन आला. नमुद आरोपीने परवान्यापेक्षा जास्त रेती भरलेली आढळली. आरोपीने तो स्वतःच वाहन मालक असल्याचे सांगितले.पोलीसांनी पंचासमक्ष वर १० चक्का ट्रक क एम एच ४० बी एल ४७१८ किमती १५,००,००० /- रूपये आणि ६ ब्रास रेती किंमती ३०,०००/- रूपये आणि असा एकुण १५,३०,०००/रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद आरोपी यांच्या विरूध्द पोस्टे उमरेड येथे कलम ३०३(२) भा.न्या. सं सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.