कुही :- कुही पोलीस पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, उमरेड कडुन १० चक्का ट्रक क एम एच ४० सीटी ४३५८ मध्ये अवैधरित्या रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी पाचगाव शिवार उमरेड नागपुर हायवेवर श्रीकृष्ण लँड डेव्हलपर्स चे लेआउट जवळ नाकाबंदी केली असता १० चक्का ट्रक के एम एच ४० सीटी ४३५८ मिळून आल्याने वाहन थांबवून वाहनाची पाहणी केली असतात्यामध्ये रेती आढळुन आली. वाहन चालक पवन सुनिल बोकळे, वय २८ वर्ष, रा. चिचाळा ता. भिवापुर जि. नागपुर हा मिळुन आला. नमुद आरोपीला रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली.
पोलीसांनी पंचासमक्ष वर १० चक्का ट्रक क एम एच ४० सीटी ४३५८ किमती ४०,००,००० /- रूपये आणि ४ ब्रास रेती किंमती २०,०००/- रूपये आणि असा एकुण ४०,२०,०००/रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद आरोपी यांच्या विरूध्द पोस्टे कुही येथे कलम ३०३ (२) भा.न्या. सं सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.