– ३ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त
रामटेक :- रामटेक पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, नगरधन रामटेक येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) राहुल नागोराव चौरे, वय २६ वर्ष, रा. वलनी सावनेर २) रितीक सिदार्थ बागडे, वय २४ वर्ष, रा. नगरधन, ता. रामटेक ३) प्रदिप मानिक मारवाडे, वय ३० वर्ष, रा. नगरधन ४) निकेश मोरेश्वर मलेवार, वय २५ वर्ष, रा. नगरधन ५) सचिन सुलके, रा. नगरधन ६) रवि मानेश्वर, रा. नगरधन ७) यश कामडी, रा. नगरधन ८) आशिष कावडे, रा. नगरधन ९) निखिल शाहुसाखळे रा. नगरधन हे ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळतांना जागीच मिळुन आले. आरोपीतांच्या ताब्यातुन १) ५२ तासपत्ते २) चार दुचाकी वाहन किंमती ३,५०,०००/- रूपये ३) एक अँन्ड्राईड मोबाईल किंमती ३७,०००/- रूपये ४) नगदी ६५०/- रूपये असा एकुण ३,८७,६५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन रामटेक येथे १२ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.