– ३८ गोवंश जनावरांची सुटका
बेला :- बेला पोलीसांना माहीती प्राप्त झाली की, अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतुक केली जात आहे. अशी माहीती मिळताच पोलीसांनी सदर वाहन शोध कामी पेट्रोलींग केली असता मौजा खातखेडा शिवार, सिर्सी येथे एक संशयीत टाटा कंपनीचा आयसर वाहन क्र. एम एच ४९ ए टी २७८१ हे वाहन दिसुन आले. पोलीसांना पाहुन सदर वाहन चालकाने त्याचे वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने पोलीसांनी नमुद वाहनाचा पाठलाग केला असता आरोपी चालक वाहन सोडून पळून गेला. पोलीसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ३८ गोवंश जनावरे मिळुन आले. नमुद जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अंत्यत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले. पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून एक टाटा कंपनीचा आयसर वाहन कमांक एम एच ४९ ए टी २७८१ किंमती १५,००,०००/- रूपये आणि ३८ गोवंश जनावरे किंमती २,८२,०००/- रूपये असा एकुण किंमती १७,८२,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला. सुटका केलेल्या गोवंश जनावरांना देखभालीसाठी औंदुबर गौरक्षण संस्था, रूई खैरी, येथे दाखल करण्यात आले आहे.
नुमद प्रकरणी वाहन चालक आणि मालक आरोपींविरूध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.