– ०२ वाहनामधील ०५ गोवंश जनावरांची सुटका
नरखेड :- नरखेड पोलीसांना गुप्त बातमीदारद्वारे माहीती प्राप्त झाली की, नरखेड ते मोवाड रोड, नाडेकर हायस्कुल जवळ अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणारे दोन वाहन मिळुन आले आहे. अशी माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता नमुद ठिकाणी १) पिकअप वाहन क. एम एच ४० सी टी १७६९ २) टाटा एस वाहन क एम एच ०४ एच डी १८३९ हे दोन वाहन मिळुन आले. वाहन क्र. १. पिकअप वाहन क. एम एच ४० सी टी १७६९ चा चालक १) गोपाल शिवलाल कवडती वय २७ वर्ष रा. रमना, नरखेड हा असुन नमुद वाहनामध्ये ०३ गोवंश (बैल) मिळुन आले. वाहन क्र. २. टाटा एस वाहन क एम एच ०४ एच डी १८३९ ना चालक आरोपी जावेद युसुफ शेख, वय ३८ वर्ष, रा. वरूड, जि. अमरावती हा असुन नमुद वाहनामध्ये ०२ गोवंश (बैल) मिळुन आले. नमुद जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले.
पोलीसांनी पंचासमक्ष दोन्ही वाहनामधील एकुण ०५ बैल जनावरे किंमती १,२५,०००/- रूपये व दोन्ही वाहने किंमती ५,५०,०००/- रूपये असा एकुण किंमती ६,७५,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला. जनावरांबाबत विचारपुस केली असता वाहन कं १ मधील जनावरे चंद्रभान मारोतराव कोसरे यांच्या मालकीची असुन वाहन कं २ मधील जनावरे सुरज सिताराम सिंगर यांच्या मालकीची असल्याचे नमुद आरोपीतांनी सांगितले. सुटका केलेल्या जनावरांना जय श्रीकृष्ण गौशाळा गोंडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
नमुद प्रकरणी वाहन चालक आरोपी १) गोपाल शिवलाल कवडती, वय २७ वर्ष, रा. रमना, नरखेड २) जावेद युसुफ शेख, वय ३८ वर्ष, रा. वरूड, जि. अमरावती ३) चंद्रभान मारोतराव कोसरे, वय ४५ वर्ष, ४) सुरज सिताराम सिंगर, वय ३० वर्ष, दोन्ही रा. पंढरी मोहगा, ता. सौंसर (मध्यप्रदेश) यांचेविरूध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.