कन्हान :- कन्हान पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, जुना नगर परीषदच्या मागे, कन्हान येथे मोहम्मद ईब्राहीम मोहम्मद शफी, वय २६ वर्षे, रा. आझाद नगर, ड्रगन पॅलेस टेम्पलच्या मागे, कामठी, ता. कामठी हा काही लोकांकडुन पैसे घेवुन सट्टापट्टीचे आकडे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचले असता जुना नगर परीषदच्या मागे कन्हान येथे आरोपी मोहम्मद ईब्राहीम मोहम्मद शफी, वय २६ वर्षे, रा. आझाद नगर, ड्रगन पॅलेस टेम्पलच्या मागे, कामठी, ता. कामठी हा कागदावर आकडे लिहुन सट्टापट्टी चालवित असतांना मिळुन आला. पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून रोख रक्कम २,३५०/- रूपये, सट्टापट्टी साहित्य असा एकुण २,६३५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपी मोहम्मद ईब्राहीम मोहम्मद शफी, वय २६ वर्षे, रा. आझाद नगर, ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या मागे, कामठी, ता. कामठी याच्या विरूद्ध कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.