spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बंद घराचे कुलूप तोडून ३.८६ लाखांचा ऐवज लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर १९ :  शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची एक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे ३.८६ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार, वैभव नारायणराव भडांगे (वय ४५), रा. ग्रीन सिटी, एमराल्ड आय, ए विंग, गोटलपंजरी हे आपल्या कुटुंबासह राहतात. ते एका फार्मा कंपनीत कार्यरत असून, १३ ऑगस्ट रोजी ते कुटुंबासह अमरावती व अकोला येथे कामानिमित्त गेले होते. या कालावधीत म्हणजे १३ ते १६ ऑगस्टदरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून एकूण ३,८६,४०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. १६ ऑगस्ट रोजी भडांगे कुटुंब घरी परतले असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरात पाहणी केली असता मौल्यवान वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी वैभव भडांगे यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles