खापा :- स्थानिक जिजामाता विद्यालय व कनिष्ठ कला महाविघालय, खापा येथे बालिका दिन व सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेतील शिक्षका मुक्ता कडु, प्रमुख अतिथी शिक्षिका रचना मोहने, वर्षा धार्मिक, मुख्याधापक सुधाकर गजभिये, शिक्षक राजेन्द्र भोंगाडे, देवेंद्र धुंदे, बावनकर, वडे, भाग्यश्री मायकरकर, विद्या गभने, पल्लवी धुवाधप्पार, कनिष्ठ लिपीक आनंद मेनकुदळे, शिक्षकेत्तर कर्मचारी शिला येनुरकर, दर्शना खुबाळकर, सुमीत्रा भारसाकरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कोमल रोकडे हिने केले. आभार प्रदर्शन विद्यार्थिनी शेजल मिश्रा हिने केले, या कार्यक्रमामध्ये अध्यक्षा व प्रमुख पाहुणे यांनी तसेच विद्यार्थीनी सावित्रीबाई यांच्या जिवनावर प्रकाश टाकला, सांस्कृतिक नुत्य सादरीकरण करण्यात आले. सर्व विघार्थी व विद्यार्थीनीना बिस्किट वाटप करण्यात आले.








