spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवी मुंबई पोलिसांच्या ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे :- नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज असलेल्या ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे (ICCC) सीबीडी बेलापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात आज मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक कमांड सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्यातून साकारलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व रोजगार हमी मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांची विशेष उपस्थिती लाभली. विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य मंदाताई म्हात्रे, महेश बालदी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील व पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्यासह विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अभियंता शिरीष आरदवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

‘ऑलवेज वॉचिंग, ऑलवेज प्रोटेक्टिंग’ हे ब्रिदवाक्य असलेल्या या ‘प्रहारी’ प्रणालीमुळे शहरातील प्रत्येक हालचालीवर चोवीस तास बारीक नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हे केंद्र नवी मुंबई पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Popular Articles