नागपूर :- राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात विविध विभागांची बैठक घेतली.
हिवाळी अधिवेशनानंतर प्रथमच नागपूर भेटीवर आलेल्या मुख्य सचिवांचे स्वागत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरीक्त आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजूसिंग पवार, अपर आयुक्त महसूल राजेश खवले आणि माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.![]()
अग्रवाल यांनी नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो,महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (एमआरएसएसी),पुरातत्व विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभागांची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला.