spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीएम श्री जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा दहेगाव येथे बालक दिन विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा

किशोर साहू, मौदा ,ता.१५:- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा दहेगाव येथे शुक्रवार ( दि.14 नोव्हेंबर ) ला पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिन बालक दिन म्हणून साजरा करण्यात आला. तसेच जनजातीय गौरव पंधरवडा या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात आदिवासी नृत्य , वैयक्तिक नृत्य, वारली पेंटिंग, तसेच विद्यार्थ्यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन चरित्रावर भाषण दिले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे, उपाध्यक्ष रणधीर आंबीलढुके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले.आपल्या प्रास्ताविक भाषणातून विद्यार्थ्यांना पं. जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन ऐंजल घडोले यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकवृंद सुधीर कांबळे, सुधीर खंडाईत यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन चरित्रावर आधारित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या दिवशी विद्यार्थी केंद्र बिंदू मानून विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे, राजेश रोहाड,लीलाधर काळबांधे ,प्रज्ञा रामटेके , सुजाता बोधेले, संगीता आंबिलढुके प्रयत्न केले. तसेच या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी शिक्षकवृंद उमेश उके , पुष्पलता उके , कैलास फटिंग यांनी विशेष सहकार्य केले. आभारप्रदर्शन शिक्षक राजेश रोहाड यांनी केले.

Popular Articles