नागपूर :- अलीकडे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. यांच्या हेडलाईटचा प्रखर पांढरा आणि मरक्युरी लाईटमुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकाचे व पायी चालणाऱ्यांचे डोळे दिपतात, दुचाकीस्वारांना रस्त्यावरील खड्डे, ब्रेकर, किंवा समोर काय आहे दिसतच नाही, पुढे जाऊन यु टर्न घ्यायचा असल्यास समोरुन येणारं वाहन किती अंतरावर आहे हे कळतच नाही अशा स्थितीत अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अपघाताची मालीका रोखण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविणे ही काळाची गरज आहे.
सन – 1980–85 च्या दशकात सर्वच वाहनांच्या हेडलाईट ला वरच्या भागाला काळा रंग लावणे बंधनकारक होते. त्यामुळे समोरच्या येणाऱ्या वाहन चालकांना या हेडलाईट च्या प्रकाशाचा, त्रास होत नव्हता हा एक चांगला नियम होता, परंतु आता या नियमांचा सर्वांना विसर झालेला आहे. त्यामुळे परीवहन विभाग, पोलीस विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. ही बाब कोणीही गांभीर्याने घेत नाहीत ! करीता रस्ते सुरक्षेसाठी व प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरीक मंडळ शामनगरचे सचिव अशोक कातुरे यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनजागृती सुरु केली आहे. प्रशासनाने पूर्ववत हेडलाईट ला काचावर काळा रंग लावण्याचा नियम अंमलात आणावा. नागरीकांनी सुद्धा याचा पाठपुरावा करावा. अशी मागणी ज्येष्ठ नागरीकमंडळा कडून करणायात येत आहे. श्री स्वामी समर्ध ज्येष्ठ नागरीक मंडळ शामनगर नागपुरातील सचिव अशोक कातुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.