spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पायाभूत सुविधांवरील मर्यादामुळे ग्राहक समस्या जटील, राष्ट्रीय ग्राहक दिन प्रबोधनाचा सूर

नागपूर :- पायाभूत सुविधांवर येणाऱ्या मर्यादांमुळे ग्राहकांचे प्रश्न समस्या सुटण्यास विलंब लागतो किंवा त्या अधिक जटील होतात, असा सूर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने ग्रहक पंचायत कार्यालय रामदासपेठ, येथे आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या भरगच्च प्रबोधन कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अ.भा.ग्रा. पंचायतचे प्रांत कोषाध्यक्ष संजय धर्माधिकारी कार्यक्रम ताज्या दमाचे अन्न औषधी परिमंडळाचे सहआयुक्त अजय सुभाष सदार, अन्न सुरक्षा अधिकारी तात्या लोखंडे, प्रमुख अतिथी वैधमापन शास्त्र नागपूर परिमंडळाचे उपनियंत्रक, विजय झोटे, हायकोर्ट बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा अॅड. स्मिता देशपांडे, अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गजानन पांडे, प्रांत कोषाध्यक्ष संजय धर्माधिकारी या सर्वांचे वक्तव्यातून वरील सूर व्यक्त झाला आणि समस्या सोडवणुकीसाठी सर्व स्तरावर आव्हानात्मक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले, यावेळी व्यासपीठावर नागपूर जिल्हाध्यक्ष गणेश शिरोळे उपस्थित होते.

प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर पाहुण्यांचे स्वागत झाले. स्वागतानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गजानन पांडे यांनी प्रास्ताविक केले प्रस्ताविकात बोलतांना त्यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.

प्रमुख वक्ता म्हणून बोलतांना अन्न औषधी विभागाचे अजय सदार यांनी ग्राहक विचार मांडतांना समस्यां मधून निर्माण झालेली गरज वास्तविकतेने पूर्ण व्हावी म्हणून  ग्राहक संघटना आहे असे सांगितले. अन्न औषधी विभागाचे अन्न अधिकारी तात्या लोखंडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानात ग्राहक समस्या सुटणे जटील झाल्याचे मत मांडले.

वैद्यमापन शास्त्र नागपूर विभागाचे उपनियंत्रक श्री विजय झोटे यांनी अमर्याद समस्या आणि मोजका कर्मचारी वर्ग यामुळे ग्राहकांनी स्वतःची दुकाने किंवा व्यवसाय प्रतिष्ठाने निवडून ठेवावे त्या परिचयामुळे आपल्याला व्यवहारातील फसवणूक कमी करण्यास मदत होईल व सध्या बाजारात असलेले इलेक्ट्रीक वजन काटे यात मोठी तफावत आहे व त्याने बाजारात मोठा धुमाकुळ घातला आहे. त्यावर कारवाई मोहीम सुरु असून एकाच वेळी ३०० इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले आहे.

हायकोर्ट बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा अॅड. स्मिता देशपांडे यांनी ग्राहक आयोगात पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने खटले प्रलबित होत आहे. कोरोना काळात आम्ही ऑनलाईन सुनावणीची कल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न केला ते आजही सुरु आहे असे त्या म्हणाल्या, कार्यक्रमात प्रश्नोत्तर द्वारे समाधानाचा प्रयत्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर महानगर सचिव समीर जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन नागपूर जिल्हा सचिव प्रकाश भुजाडे यांनी केले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी सर्वश्री प्रमोद भागडे सुधांशु दाणी, उदय दिवे, श्रीपाद हरदास अरविंद हाडे, माया हाडे, अॅड. अनिरुध्द दंडे, किरण काळे, प्रा.डॉ. प्रीती बैतुले, आनंद मुळे, जीवन झाडे, राजेश दिवाण, सुधीर जोशी, आणि  जोगदंड, विवेक दीक्षित, श्रीकांत चिखलीकर, गोविंदराव बोबडे यांचेसह इतर पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles